स्वप्न
आत्ता एक भयानक स्वप्न पडलं
....
मस्ती म्हणून, मी कोणत्या तरी जुनाट विहिरीत तळ काढायचा म्हणून खाली खाली जात होतो, २-३ वेळा प्रयत्न केला तरी तळ निघत नव्हता, मध्ये शेवाळाचा पुंजका लागल्याने जरा घाबरलो. मग बाहेर आलो आणि एका मित्राला म्हणालो आपण दोघे मिळून तळ काढू. त्याला घेऊन जाण्याअगोदर आत एकदा आवाज टाकून बघावा असं मनात आलं. विहिरीत मी कुणी अडकलंय का म्हणून आवाज टाकला..आणि चक्क आतून त्याला प्रतिसाद मिळाला..कुणीतरी लहान मूल अडकल्याचा, आवाज ऐकल्या ऐकल्या डोक्यात मुंग्या आल्या की असल्या जुन्या, शेवाळाने भरलेल्या जुन्या विहिरीतून आपल्याला प्रतिसाद का मिळाला? मी तरी आवाज का टाकला?
आणि खाडकन जाग आली, डोळे उघडले...घड्याळ पाहिलं तर मध्यरात्रीचे २ वाजले होते..
....
चित्रपटाची कल्पना डोक्यात सुरू झाली. चित्रपटाच्या नायकाला एखाद्या तळ्यातून, विहिरीतुन असे लहान मुलाचे आवाज येतात, त्याला स्वस्थ बसू देत नाहीत. मग तो त्या आवाजाच्या दिशेने शोध घ्यायला सुरुवात करतो. त्याला आवाजांचा स्रोत सापडतो, त्याला समजतं अमुक एका तळ्यातून/विहिरीतून आवाज येत आहेत. तो तिथे जाऊन कुणी अडकलंय का म्हणून पुन्हा ३-४ वेळा आवाज टाकतो तर आत तळ्यात बुडालेल्या २-३ मृतदेहांचे डोळे उघडतात, अंगाचा थरकाप उडवणारं पार्श्वसंगीत सुरू होतं आणि ती मदतीसाठी हाक मारू लागतात, चित्रपटाच्या खलनायकानं त्यांची हत्या केलेली असते...मग बचावकार्य सुरू होतं, ते बचावकार्य म्हणजेच पूर्ण चित्रपट...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
पाण्यातली भुतं म्हणजे,
आवडीचा विषय!
किती लिहावं आणि किती नाही!!!
मला काही कामं नाहीत.
दुर्लक्ष करा, तुम्ही शांत झोपा..
💀💀💀💀💀💀💀
(कृपया भूत वगैरे काही नसतं म्हणून रात्री अडीच वाजता लिहिलेल्या पोस्टची वाट लावायला येऊ नका बरं!!!)

Comments
Post a Comment