फेसबुकपोस्ट - ४

दिनांक - ४ ऑगस्ट, २०१७

आत्ताच ऍमेझोन प्राईमची ५०० रु. वार्षिक वर्गणी भरली आणि त्याअंतर्गत हिंदी मिडीअम चित्रपट बघितला. हिंदी मिडीअम हा चित्रपट इंग्रजी माध्यमाच्या भपक्याला भुलणाऱ्या पालकांची मानसिकता अधोरेखित करतो. त्यात कुठेही, मातृभाषेतून शिक्षण महत्त्वाचे आहे/मातृभाषेतून शिका/इतर कोणतीही भाषा शिकायला प्रथम मातृभाषा पक्की असणे गरजेचे आहे, हे मुद्दे अधोरेखित होत नाहीत. शिवाय चित्रपटाच्या शेवटी 'दिल्ली ग्रामर स्कूल' मधल्या मुलांच्या कार्यक्रमानंतर इरफान खान जेव्हा भाषण ठोकतो त्यावेळी उलट अशा शाळेत ही मुले शिकली तर कुठल्या कुठे जातील वगैरे डायलॉग मारतो...यामुळे चित्रपटात अशा पंचतारांकित इंग्रजी शाळांचं महत्त्व शेवटी जास्त वाढवलं गेलं आहे, म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी... जिथे मातृभाषेतून शिक्षणाच्या प्राथमिक मुद्द्यालाच फाट्यावर मारलं जातं तिथे ब्रम्हदेव जरी आला तरी अपेक्षित परिणाम दिसणार नाहीत..

असो! आपण आपलं काम करत राहूया...
आपल्याला अगदी मोफत जरी इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळाले तरी नको..
कारण इंग्रजी आपली मातृभाषा नाही!
इंग्रजी केवळ विषय म्हणून शिका, इंग्रजीतून सर्व विषय शिकण्याची गरज नाही!!!
शिक्षणासाठी फक्त मराठी शाळाच!!!

- सुचिकांत वनारसे

Comments

Popular Posts