फेसबुकपोस्ट - ५

फेसबुकपोस्ट - ५
दिनांक - २६ जुलै, २०१७

बुलढाणा-चिखली गावचे एक सेवानिवृत्त शिक्षक आहेत,श्री. हरिभाऊ सावजी सर, वय वर्ष ७१! सर संघाचे प्रचारक होते, वयोमानामुळे त्यांना आता जमत नाही. त्यांनी घेतलेले अनेक शैक्षणिक उपक्रम ते रोज लिहून आम्हाला whatsapp वर पाठवतात, आणि आम्ही गडचिरोली ते कोकण सर्वत्र असे उपक्रम पोहोचवायचं काम करतो. या वयातदेखील समाजाच्याप्रति असलेली बांधिलकी पाहून कौतुक वाटतं. त्यांनी आज प्रथमच फोन केला, आणि १५-२० मिनिट गप्पा मारल्या. गोळवलकर गुरुजींपासून संघातल्या मोठ्या नावांचा आपल्यावर कसा प्रभाव पडला आपण कसे घडलो, संघात काय शिकायला मिळालं, आपला मित्रवर्ग त्यांनी कसा वाढवलाय आणि जोपासलाय, विद्यार्थ्यांशी कशाप्रकारे आजही संपर्कात असतात, माजी विद्यार्थी आजही त्यांच्याकडे कशाप्रकारे मार्गदर्शनाला येतात, ई. वर भरभरून बोलले...

अगदी प्रामाणिकपणे मान्य करावं लागेल की संघाचे असे निःस्वार्थी वृत्तीचे लोक भेटल्यावर जाम भारी वाटतं..
सर तुमच्या सारख्या अनेकांच्या कार्याला नमन🙏

- सुचिकांत वनारसे

Comments

Popular Posts